#BanSunburnFestival सनबर्न फेस्टिव्हल दरवर्षी घेतंय तरुणाईचा बळी  

वृत्तसंस्था
शनिवार, 14 डिसेंबर 2019

गोव्यात वर्षागणिक ड्रग्ज माफियांची संख्या वाढत आहे आणि त्यांच्या विरोधात होणाऱ्या खटल्यांचीदेखील संख्या वाढत आहे. हेच सगळे लोक दरवर्षी सनबर्न फेस्टिव्हलमध्ये तरुणाईला ड्रग्ज पुरवत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी आता सर्वस्तरातून होऊ लागली आहे.

'न्यू ईअर' आधी देशात होणारी सर्वांत 'वाईल्ड' पार्टी म्हणजे सनबर्न फेस्टिव्हल. गोव्याच्या व्हॅगटॉर बिचवर होणारं सनबर्न फेस्टिव्हल हे जगातील सर्वांत फेमस म्युझिक फेस्टिव्हलपैकी एक आहे. मात्र, याचा काळा चेहरादेखील आहे. 

दरवर्षी सनबर्न फेस्टिव्हलमध्ये संगीताच्या नावाखाली आमली पदार्थांचा अतिरेक होतो. तरुणाई अगदी मोकळेपणाने आमली पदार्थांचे सेवन करत असते. या आमली पदार्थांच्या अतिरेकामुळे देशभरातील अनेक तरुण तरुणींना आपला जीव गमवावा लागला आहे. 

गोव्यात वर्षागणिक ड्रग्ज माफियांची संख्या वाढत आहे आणि त्यांच्या विरोधात होणाऱ्या खटल्यांचीदेखील संख्या वाढत आहे. हेच सगळे लोक दरवर्षी सनबर्न फेस्टिव्हलमध्ये तरुणाईला ड्रग्ज पुरवत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी आता सर्वस्तरातून होऊ लागली आहे. ट्विटवर #BanSunburnFestival असा हॅशटॅग सध्या प्रचंड ट्रेण्ड होत आहे. 

गोव्यात ड्रग्ज माफियांविरुद्ध नोंदवलेल्या खटल्यांची संख्या 
2014-  54
2015- 61
2016- 60
2017- 168
2018- 222
2019- 114 (जूनपर्यंत)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter erupts to oppose sunburn festival in goa