esakal | ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम दोन दिवसांत ब्लॉक होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter Facebook Instagram

ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम दोन दिवसांत ब्लॉक होणार?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - केंद्र सरकारने (Central Government) सोशल मिडीयासाठी (Social Media) तयार केलेली नवी आचारसंहिता आणि त्रिस्तरीय तक्रार निवारण पद्धत दोन दिवसांत लागू होत असून त्याचे पालन केले नाही तर ट्विटर, (Twitter) फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) या मोठ्या साइट ब्लॉक (Site Block) होऊ शकतात. (Twitter Facebook Instagram will be blocked in two days)

सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. वृत्त देणाऱ्या वेबसाइट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीचे नियम २५ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. त्याचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ती उद्या संपुष्टात येत आहे. त्याआधी पालन केले नाही तर या सोशल मिडीयाचा मध्यस्थीचा दर्जा संपुष्टात येऊ शकतो आणि इतकेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई होऊ शकते. या कंपन्या मध्यस्थांना मिळणाऱ्या संरक्षणासाठी दावा करतात, मात्र मजकुराबाबत सुधारणा आणि निवाड्याबाबत भारतीय राज्यघटना आणि कायद्याचे संदर्भ बाजूला ठेवून त्यांच्या निकषांनुसार धोरण ठरवितात.

हेही वाचा: रामदेव यांचं IMA, फार्मा कंपन्यांना खुलं पत्र; विचारले २५ प्रश्न

मंजुरीचा मुद्दा

सोशल मीडिया कंपन्या भारतात काम करतात. भारतामधून त्यांना नफा होतो. नियमांचे पालन करण्याबाबत मात्र त्यांना मुख्यालयाकडून परवानगी हवी असते. माहितीची खातरजमा आणि तपासणी कशी केली जाते याचे निकष ते निश्चीत करीत नाहीत आणि त्याचा तपशीलही जाहीर करीत नाहीत, असे सरकारचे म्हणणे आहे.

loading image
go to top