राहुल गांधींचे अकाऊंट 'अनलॉक'; ट्विटर नरमले

Rahul Gandhi
Rahul Gandhi
Summary

काँग्रेस सोबतच्या तणावानंतर ट्विटरने राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांचे ट्विटर अकाऊंट अनलॉक केलं आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस सोबतच्या तणावानंतर ट्विटरने राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांचे ट्विटर अकाऊंट अनलॉक केलं आहे. गेल्या एक आठवड्यापासून राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट बंद होते. ट्विटर इंडिया प्रमुखाचे ट्रान्सफर केल्यानंतर ट्विटरने राहुल गांधींचे अकाऊंट अनलॉक केले. काही दिवसांपूर्वी, दिल्लीमध्ये एका पीडितेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात कुटुंबियांचे फोटो शेअर केल्यामुळे राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले होते. (National Latest News)

राहुल गांधींकडून कंपनीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत ट्विटरने ही कारवाई केली होती. याशिवाय काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट आणि अनेक वरिष्ठ नेत्यांचे अकाऊंट निलंबित करण्यात आले आहेत. ट्विटरच्या या कारवाईनंतर काँग्रेसने कंपनीवर टीकेची झोड उठवली. ट्विटर पक्षपाती भूमिका घेत असून सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. अखेर ट्विटरने काहीशी मवाळ भूमिका घेतली आहे.

Rahul Gandhi
भारतात नाकाद्वारे कोरोना लस लवकरच; दुसऱ्या टप्प्यात ट्रायलसाठी मंजुरी

माहितीनुसार, काही काँग्रेस नेत्यांचेही ट्विटर अकाऊंट अनलॉक करण्यात आले आहेत. पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आले आहे. तसेच काँग्रेस इतर काही नेत्यांच्या अकाऊंटवरची बंदी उठवण्यात आली आहे. शुक्रवारी ट्विटरने आपले इंडियातील प्रमुख मनीष माहेश्वरी यांना अमेरिकेत ट्रान्सफर केले आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट खाते अनलॉक करण्याची माहिती मिळाली आहे.

Rahul Gandhi
Corona Update - देशात दिवसभरात 38 हजार नवे रुग्ण; 478 जणांचा मृत्यू

राहुल गांधींनी ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आल्यानंतर कंपनीवर हल्लाबोल केला होता. ट्विटर पक्षपाती प्लॅटफॉर्म आहे. जे सरकार (govt) सांगतं, तेच ट्विटर ऐकतं, ट्विटर देशाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असून लोकशाही रचनेवर आघात करत आहे. ट्विटरवरुन मत मांडता यायचे, त्यामुळे तो आशेचा एक किरण होता. पण आता असे राहिलेले नाही. ट्विटर तटस्थ व्यासपीठ राहिलेले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com