Crime News: सावत्र बापाचा दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

Crime News
Crime News

Crime News: अल्पवयीन मुलांवर सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो एका हॉटेलमध्ये काम करतो. पोलिसांनी त्याला पूर्व दिल्लीतील घरातून अटक केली.

आरोपीने मुलांवर त्यांच्या आईच्या अनुपस्थितीत लैंगिक अत्याचार  केले.  पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो कायदा, प्राणघातक हल्ला आणि अनैसर्गिक गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने वर्षभरापूर्वी मुलाच्या आईशी लग्न केले होते. गेल्या फेब्रुवारीमध्ये त्यांच्याविरुद्ध पहिली तक्रार आली होती.

जेव्हा लहान मुलाने विरोध केला. तेव्हा आरोपीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. महिलेने तिच्या तक्रारीत खुलासा केला आहे की, आरोपी हा तिचा दुसरा नवरा असून दोन्ही मुले पहिल्या पतीची आहेत. तिचा सध्याचा नवरा तिच्या मुलांशी अयोग्य वर्तन करायचा, त्यात मुलांचे कपडे काढायचा आणि वारंवार अश्लील कृत्ये करायचा, असा आरोप महिलेने केला आहे.


मुलाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करते. आई कामासाठी बाहेर असताना सावत्र वडिल त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात. तसेच शिवीगाळ देखील करतात.

Crime News
Dhangar Reservation : ..तर महाराष्ट्रातसुद्धा जाट आंदोलनासारखं धनगर समाजाचं आंदोलन उभा होईल; पडळकरांचा सरकारलाच इशारा

पोलिस उपायुक्त रोहित मीणा म्हणाले, "आम्ही मुलांच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आणि मुलाच्या जबाबाच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. आम्हाला आढळले की त्याच्यावर आणखी एक पॉक्सो कायद्याचा गुन्हा आहे. आम्ही तपास करत आहोत. कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल." (Crime News)

"2022 मध्ये याच महिलेने तिच्या पतीविरुद्ध जगतपुरी पोलिस स्टेशनमध्ये मुलासोबत अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करत अशीच तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती आणि नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते," अशी माहिती देखील पोलिसांनी दिली.

Crime News
Maharashtra Politics: "मित्रपक्षांनी दादांवर टीका करणे म्हणजे अपमान, मग..."; भाजप आमदाराचा खोचक प्रश्न!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com