भारत-बांगलादेश सीमेवर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन BSF जवानांना अटक; टीएमसी-भाजप आमनेसामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSF Jawan

महिलेनं पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

भारत-बांगलादेश सीमेवर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन BSF जवानांना अटक

बांगलादेशातून भारतात बेकायदेशीरपणे (India-Bangladesh Border) प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) दोन जवानांना (BSF Jawan) अटक करण्यात आलीय.

बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, शुक्रवारी रात्री उशिरा अटक केल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलला कायदेशीर कारवाईसाठी पश्चिम बंगाल पोलिसांच्या (West Bengal Police) ताब्यात देण्यात आलंय. सध्या आरोपींना निलंबित करण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: जयललितांचा मृत्यू कसा झाला? अरुमुघस्वामी आयोगानं मुख्यमंत्र्यांकडं अहवाल केला सादर

पश्चिम बंगालमधील (West Bengal) उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बगदा सीमा चौकीजवळ 26 ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडलीय. बीएसएफ कॉन्स्टेबलनं भारतातून बांगलादेशात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला पकडलं. त्यानंतर कॉन्स्टेबलनं महिलेला जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला, तर सहायक उपनिरीक्षकानं त्याला गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप आहे. महिलेनं पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा: आझादांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; तेलंगणात माजी खासदाराचा राजीनामा

महिलांसाठी देश असुरक्षित : TMC

या घटनेवरून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता (BJP) पक्ष यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालंय. TMC नं ट्विट केलंय की, 'भाजपच्या कुशासनात आपला देश महिलांसाठी असुरक्षित होत आहे. अमित शहाजी (केंद्रीय गृहमंत्री), तुमच्या शासनात बीएसएफ अधिकारी आणि जवानानं एका महिलेवर बलात्कार केलाय आणि आवाज उठवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिलीय. खऱ्या अर्थानं स्वावलंबी भारताचं हे ज्वलंत उदाहरण आहे!' याप्रकरणी टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला माफी मागावी, असं आवाहन केलंय.

Web Title: Two Bsf Jawan Arrested For Raping A Woman On India Bangladesh Border West Bengal Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..