पंजाबमध्ये स्फोटात दोन ठार; अकरा जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. बाबा दीपसिंग यांच्या जयंतीनिमित्त या नगर कीर्तनचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातील पोलिसांनी या दुर्घटनेमध्ये दहापेक्षाही अधिक  लोक ठार झाल्याचा दावा केला होता; पण नंतर पोलिस महासंचालकांनीच यात दुरुस्ती करत केवळ दोन लोक मरण पावल्याचे स्पष्ट केले.

चंडीगड - येथे शीख धर्मीयांच्या नगर कीर्तन या धार्मिक कार्यक्रमादरम्यान आज सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटामध्ये दोघे जण ठार; तर अकरा जण जखमी झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. बाबा दीपसिंग यांच्या जयंतीनिमित्त या नगर कीर्तनचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातील पोलिसांनी या दुर्घटनेमध्ये दहापेक्षाही अधिक  लोक ठार झाल्याचा दावा केला होता; पण नंतर पोलिस महासंचालकांनीच यात दुरुस्ती करत केवळ दोन लोक मरण पावल्याचे स्पष्ट केले.

या धार्मिक कार्यक्रमादरम्यान अन्य ज्वलनशील घटकांचा वापर करत फटाके पेटविण्यात आले. त्यामुळे शेजारीच असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील फटाक्यांचाही स्फोट झाला. लोकांनी उत्साहाच्या भरात फटाके पेटविल्यानंतर जवळच उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील फटाक्यांनीही पेट घेतला. या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की काही क्षणांमध्ये नागरिकांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two death and eleven injured in punjab blast