Madduramma Festival : बंगळूरजवळ रथ कोसळून दोन जणांचा मृत्यू
Bengaluru Accident : बंगळूरजवळील अनेकलमध्ये मुसळधार पावसामुळे मद्दुरमा यात्रेतील दोन रथ कोसळले, ज्यात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले आहेत. प्रशासन आणि स्थानिक लोकांनी बचावकार्य सुरू केले आहे.
बंगळूर : मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हुसकूर मद्दुरमा यात्रेमध्ये दोन रथ कोसळले. या घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.