LPG Cylinder Leak : अभिषेकने गॅस रिकामा झाल्यानंतर दुसरा सिलिंडर जोडला होता. त्याला गॅस गळती लक्षात आली नाही. नंतर देवाच्या फोटोसमोर दिवा लावला असता त्याला आग लागली.
बंगळूर : बंगळूर उत्तर तालुक्यातील नेलमंगल शहराजवळील अडाकमरहळ्ळी येथे एलपीजी सिलिंडर गळतीमुळे (LPG Cylinder Leak) झालेल्या आगीच्या दुर्घटनेत दोनजण जिवंत जळून ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली, तर चारजण गंभीर जखमी झाले.