
अलिकडच्या वर्षांत कुल्लू जिल्ह्यात पॅराग्लायडिंगशी संबंधित अनेक अपघात झाले आहेत.
हिमाचल प्रदेश : कुल्लूमध्ये पॅराग्लायडिंग करताना पायलटसह दोघांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कुल्लू जिल्ह्यात (Kullu district) पॅराग्लायडिंगच्या (Paragliding) अपघातात एक प्रशिक्षक आणि एका पॅराग्लायडिंग स्वाराचा मृत्यू झालाय. पोलीस अधीक्षक गुरदेव शर्मा (Police Gurdev Sharma) यांनी सांगितलं की, मृत आदित्य वर्मा (वय 20, अंबाला) आणि पॅराग्लायडिंग पायलट कृष्ण गोपाल (वय 24) हे कुल्लू जिल्ह्यातील भाटकारल गावचे रहिवासी आहेत.
दरम्यान, पॅराग्लायडर नेमून दिलेल्या जागेवरून टेक ऑफ करताच जमिनीवर कोसळला. बुधवारी ही दुर्दैवी घटना घडलीय. "पॅराग्लायडर पाटलीकुहल पोलिस स्टेशनच्या हद्दीत उड्डाण घेतल्यानंतर लगेचच क्रॅश झाले," असं पोलिस अधीक्षक गुरदेव शर्मा यांनी सांगितलं. या अपघाताच्या कारणाचा तपास सुरू असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा: PUBG हत्याकांडात नवा ट्विस्ट; आईच्या हत्येनंतर आरोपी मुलगा कोणाला भेटायला गेला होता?
पॅराग्लायडिंगदरम्यान सात जणांना गमवावा लागला जीव
अलिकडच्या वर्षांत कुल्लू जिल्ह्यात पॅराग्लायडिंगशी संबंधित अनेक अपघात झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला 8 मार्च रोजी कांगडा जिल्ह्यातील बीर बिलिंग इथं पॅराग्लायडिंगच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला होता. यापूर्वी 2019, 2020 मध्ये कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात पॅराग्लायडर अपघातात किमान सात जणांना जीव गमवावा लागला होता. दरम्यान, कोविड-19 महामारीच्या काळात कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यांमध्ये पॅराग्लायडिंग अनेक महिने बंद होतं. साथीच्या आजारामुळं परिस्थिती सामान्य झाल्यावर इथं पोहोचलेल्या पर्यटकांनी पॅराग्लायडिंग करण्यास सुरुवात केलीय.
Web Title: Two Killed In Kullu District Paragliding Accident In Himachal Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..