Sikkim Flash Flood : पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या मॉर्टर शेलचा स्फोट! दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

File Photo
File PhotoSakal

बंगालच्या जलपाईगुडी येथे तिस्ता नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या मोर्टार शेलचा स्फोट होऊन दोन जण ठार तर इतर सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांच्या मते हे मोर्टार शेल लष्कराचे असून पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. दरम्यान सिक्किमध्ये ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला मोठा पूर आला असून या पुरात आतापर्यंत १९ लोकांचा मृत्यू झाला असून अद्याप १६ जवानांसह १०० हून अधिक लोक अद्या बेपत्ता आहेत.

जलपाईगुडीचे गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक, बिक्रमजीत लामा यांनी सांगितले की, मोर्टार शेलच्या स्फोटात ठार झालेल्या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमी सहा जणांना जलपाईगुडीच्या सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी आधीच सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितलं.

File Photo
Sikkim Flood Update : सिक्किममध्ये पुराचं थैमान! सहा जवानांसह १९ जणांचा मृत्यू,१००हून अधिक बेपत्ता

स्थानिक पोलिस सूत्रांनी सांगितले की, पीडितांनी पुराच्या पाण्यातून परिसरात वाहून गेलेल्या मोर्टार शेल्सची पाहणी करत असताना त्याचा स्फोट झाला. जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी सहापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे आणि या संख्येतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

File Photo
Cabinet Expansions: नवरात्रीत मंत्रिमंडळ विस्ताराची वाटली जाणार खिरापत? तिन्ही पक्षांना विस्ताराची गरज मान्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com