घरात नेऊन नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तरुणांचा सामूहिक बलात्कार; मोबाईलमध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

मुलीच्या आईनं फोन करण्यासाठी मोबाईल मागितला असता, मुलीसोबत घडलेल्या घटनेचं गुपित उलघडलं.

Crime News : घरात नेऊन नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तरुणांचा सामूहिक बलात्कार; मोबाईलमध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ

मथुरा : मथुरा जिल्ह्यातील (Mathura District) एका गावात नऊ वर्षांच्या मुलीवर दोन तरुणांनी घरात नेऊन बलात्कार केला. त्यानंतर बलात्काराचा व्हिडिओ बनवून मोबाईलमध्ये (Mobile) सेव्ह केला.

घाबरलेल्या मुलीनं दोन दिवस घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला नाही. मुलीच्या आईनं फोन करण्यासाठी मोबाईल मागितला असता, मुलीसोबत घडलेल्या घटनेचं गुपित उलघडलं. मुलीच्या आईनं आरोपीच्या घरी तक्रार केली असता, त्यांच्यात जोरदार भांडण झालं. पीडितेच्या आईनं घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. याबाबतचा व्हिडिओही पोलिसांना देण्यात आला आहे.

हेही वाचा: Mayawati : वाढदिनीच मायावतींची मोठी घोषणा; निवडणुकीत विरोधकांना बसणार मोठा फटका!

मथुरेतील एका गावात ही घटना घडलीये. 12 जानेवारीला नऊ वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. शेजारी राहणारे दोन तरुण मुलीला त्यांच्या घरी घेऊन गेले. दोघांनी एकामागून एक मुलीवर बलात्कार केला आणि मोबाईलवर याचा व्हिडिओही बनवला, असा आरोप आहे.

हेही वाचा: Accident News : केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; चार पोलिसांसह 5 जण जखमी

या घटनेनं घाबरलेल्या मुलीनं नातेवाइकांना काहीही सांगितलं नाही. शनिवारी मुलीच्या आईनं नातेवाइकाला फोन करण्यासाठी मोबाइल मागितला. कॉल केल्यानंतर मोबाइल पाहिला असता, त्यात मुलीवर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ आढळून आला. आईच्या तक्रारीवरून नातेवाइकांनी आरोपीला बेदम मारहाण केली. यादरम्यान त्यांचा मुलीच्या आईशी वाद झाला. मुलीच्या आईनं डायल 112 वर कॉल केला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. रात्री पीडितेच्या नातेवाइकांनी दोन्ही तरुणांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करुन एफआयआर नोंदवला आहे.