
पोलिस असल्याची बतावणी करत चौघांनी दोन सख्ख्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संभल (उत्तर प्रदेश) : पोलिस असल्याची बतावणी करत चौघांनी दोन सख्ख्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
एका गावात त्या पीडितांचे कुटुंब गावापासून दूर राहते. 25 जानेवारी रोजी रात्री चार जण पोलिस असल्याचे सांगून घरी आले आणि दोन सख्ख्या बहिणींना मारुती मोटारीत बसविले. त्यानंतर त्या चौघांनी लैंगिक शोषण केले. आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करत पीडित मुलींनी 100 वर कॉल केला. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
शेरजील इमाम आपल्या राष्ट्रद्रोही भाषणात नेमका काय म्हणाला?
पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी केली असून, त्यांचे जबाबही घेतले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जानेवारीला रात्री चार जण घरी आले. त्यांनी पोलिस असल्याचे सांगून घराचे गेट उघडण्यास सांगितले. तसेच आपल्यावर (वडिलांवर) दारू विकत असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्या चौघांनी दोन्हीं मुलींना गाडीत बसवले आणि जंगलात घेऊन गेले.