
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील हिमच्छादित भागात सुरू असलेल्या लष्करी कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाचा निर्धार यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.