काश्मीर पंडिताच्या हत्येतील दहशतवाद्यांचा खात्मा? बांदीपोरामध्ये सैन्याची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीर पंडिताच्या हत्येतील दहशतवाद्यांचा खात्मा? बांदीपोरामध्ये सैन्याची कारवाई

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शुक्रवारी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी अरागम भागातील ब्रारमध्ये शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ठार करण्यात आलेले दहशतवादी काल करण्यात आलेल्या काश्मीरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येत सामील होते. (Two Terrorists Neutralized In Bandipora Of Jammu & Kashmir)

फैसल उर्फ सिकंदर आणि अबू उकासा अशी ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. फैसलचा गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी आणि ११ फेब्रुवारी रोजी शहरातील गुलशन चौक आणि निशात पार्क येथील तीन पोलिसांच्या हत्येमध्ये दहशतवादी हैदरसह सहभाग होता. त्यानंतर 7 आणि 8 मे च्या मध्यरात्री कुलगाममधील देवसर येथे झालेल्या चकमकीत हैदरचा खात्मा करण्यात आला. हैदरच्या हत्येनंतर, दुसरा दहशतवादी फैसल बडगाम येथे स्थलांतरित झाला.

दरम्यान, काल बडगाममध्ये काश्मीरी पंडित असलेल्या कर्मचारी राहुल भट यांच्या हत्येनंतर लष्कराचे दोन दहशतवादी बांदीपोरा येथे गेले होते. त्यानंतर टीपऑफ मिळाल्यानंतर पोलिसांनी अरगाम येथे त्यांचे ठिकाण शोधून 24 तासांच्या आत दोघांचाही खात्मा केला.

Web Title: Two Terrorists Neutralized In An Encounter At Brar Area Of Bandipora

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top