esakal | विशाखापट्टणम हादरले वायू गळतीने; दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

विशाखापट्टणम हादरले वायू गळतीने; दोघांचा मृत्यू

यापूर्वीही वायू गळती

- 5 हजारपेक्षा अधिक लोकांना बाधा

विशाखापट्टणम हादरले वायू गळतीने; दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशामधील विशाखापट्टणम येथे पुन्हा एकदा वायू गळती झाली. त्यामुळे आंध्र प्रदेश आता पुन्हा एकदा हादरले आहे. औषध निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत ही वायू गळती झाली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर चार जणांची प्रकृती बिघडली आहे. ही घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशाखापट्टणममधील सैनोर लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत वायू गळती झाली. यामधून बेंझिमिडाझोल हा विषारी वायू लीक झाला. या दुर्घटनेत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर चार कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली आहे. या चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर यातील काही कर्मचाऱ्यांना त्रास सुरु झाला. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरु केली. 

इतर कुठंही गॅस लिक नाही; पोलिसांची माहिती

जे लोक यामध्ये मृत पावलेले आहेत ते या दुर्घटनेवेळी तेथे उपस्थित होते. हा गॅस इतर कुठंही लिक झालेला नाही, अशी माहिती परवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय कुमार यांनी दिली. 

यापूर्वीही वायू गळती

विशाखापट्टणममध्येच काही दिवसांपूर्वी अशीच एक वायू गळतीची घटना घडली होती. 5000 टनाच्या दोन टँकमधून ही गॅसगळती झाली होती. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 300 हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आला होते.  

5 हजारपेक्षा अधिक लोकांना बाधा

यापूर्वी झालेल्या गॅस लिकच्या दुर्घटनेत 5 हजारांपेक्षा जास्त लोकांना बाधा झाली होती. त्यामुळे या सर्वांची प्रकृती बिघडली होती. या गॅसगळतीने ते आजारी पडले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा