

dibai flight
esakal
Flydubai Crash Plot Investigation: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाईदुबईच्या FZ1073 या विमानाचा अपघात घडवून आणण्याचा कट समोर आल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीने या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यूएईचे विशेष तपास पथक आता या घटनेचा संबंध कोणत्याही दहशतवादी कारवाईशी अथवा पूर्वनियोजित कटाशी होता का, तसेच नेमके कोणाच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला, या दिशेने कसून तपास करत आहे.