'1985 मध्ये कंपनीतील 10 हजारांची गुंतवणूक आज 300 कोटींची झाली असती'; उदय कोटक यांनी सांगितला 38 वर्षांचा प्रवास

Uday Kotak stepped down
Uday Kotak stepped down
Updated on

नवी दिल्ली- कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांनी २ सप्टेंबर रोजी पदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा केली. त्यांचा उत्तराधिकारी निवडला जाईपर्यंत सध्याचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक दिपक गुप्ता हे काळजीवाहू मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळतील. (Uday Kotak stepped down from his position as the Managing Director and CEO of Kotak Mahindra Bank)

उदय यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यातून त्यांनी कंपनीच्या सुरुवातीचे दिवस आणि कंपनीचे मार्गक्रमण याबाबत आठवणींना उजाळा दिला आहे. ६४ वर्षीय उदय कोटक यांनी कंपनी कशापद्धतीने वाढत गेली याबाबत माहिती दिली. उदय कोटक अ-कार्यकारी संचालक आणि महत्त्वाचे शेअरहोल्डर म्हणून कंपनीत कायम राहतील.

Uday Kotak stepped down
Nitin Desai : ‘नितीन देसाई आणि काही उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापकीय धडे ’

१९८५ मध्ये कंपनीत १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर ३०० कोटी रुपये परतावा मिळाला असता, असा उल्लेख त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. उदय कोटक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ पूर्ण व्हायला चार महिने राहिला असताना त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने सगळ्यांनाच आर्श्चर्याचा धक्का बसला होता.

माझा उत्ताराधिकारी कोण असेल याबाबत माझ्या डोक्यात विचार सुरु होता. सहजपणे हे व्हावं यासाठीच मी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. उत्तराधिकारी कोण असेल याबाबत आरबीआय निर्णय घेईल. संस्थापक असल्याने माझे कंपनीशी भावनिक बंध आहेत. आपल्याकडे उत्तम टीम असून कंपनीचा वारसा पुढे चांगल्यारितीने जाईल. संस्थापक गेले तरी कंपनी विकास करत राहील, असं कोटक म्हणाले.

Uday Kotak stepped down
Uday Kotak: उदय कोटक यांनी दिला कोटक महिंद्राच्या सीईओ पदाचा राजीनामा, ट्विटरवर पोस्ट करत म्हणाले...

मागे वळून जेव्हा मी पाहतो, जेपी मोरगन आणि गोल्डमन साच Goldman Sachs यांचा वित्तीय जगतावर दबदबा होता. अशीच कंपनी भारतात असावी असं माझं स्वप्न होतं. या स्वप्नासोबतच मी ३८ वर्षांपूर्वी कोटक महिंद्राची स्थापना केली. त्यावेळे केवळ ३ कर्मचारी आणि ३०० चौकिमी क्षेत्रफळाचे कार्यालय मुंबईत होते. मी माझं स्वप्न जगलो आहे, असं ते म्हणाले.

आपण सध्या एक प्रमुख बँक आणि वित्तीय संस्था आहोत. विश्वास आणि पारदर्शकतेच्या जोरावर आपण हे यश गाठलं आहे. भागधारकांचे आपण मूल्यवर्धन केले आहे. तसेच आज आपण १ लाख लोकांना थेट नोकऱ्या देतो. आपल्यासोबत १० हजारांची गुंतवणूक आज ३०० कोटींची झाली असती, असंही उदय कोटक म्हणाले. आपली संस्था अशीच प्रगती करेल आणि देशाच्या विकासात योगदान देत राहील असा विश्वास कोटक यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com