esakal | शपथविधीनंतर 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणा देणाऱ्या उदयनराजेंचे व्यंकय्या नायडूंनी टाेचले कान
sakal

बोलून बातमी शोधा

शपथविधीनंतर 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणा देणाऱ्या उदयनराजेंचे व्यंकय्या नायडूंनी टाेचले कान

यापूर्वी सुद्धा अनेकवेळा शपथविधी सोहळ्यात खासदारांनी अशा प्रकारे अन्य घोषणा दिल्याने वाद झाले आहेत. 

शपथविधीनंतर 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणा देणाऱ्या उदयनराजेंचे व्यंकय्या नायडूंनी टाेचले कान

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज (बुधवार) दिल्लीत झाला. महाराष्ट्रातुन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उदयनराजे भोसले, राजीव सातव, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, डॉ. भागवत किशनराव कराड यांनी शपथ घेतली. कोरोनाची लागण झाल्याने फौजिया खान यांना कोरोनाबाधित असल्याने त्या राज्यसभा सदस्य असूनही शपथविधीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. दरम्यान उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र; जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली. त्यावर राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन राजेंचे कान टोचले.
असे मिळवा बीएसएनएलचे इंटरनेट मोफत

नायडू म्हणाले हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे, हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही आहे. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. दरम्यान हे चित्रण खूद्ध खासदार उदयनराजे भाेसले यांच्या ट्विटमध्ये आढळते.

यापूर्वी सुद्धा अनेकवेळा शपथविधी सोहळ्यात खासदारांनी अशा प्रकारे अन्य घोषणा दिल्याने वाद झाले आहेत. गतवर्षी लोकसभा सदस्यपदाची शपथ घेताना काही खासदारांनी धार्मिक घोषणा दिल्या होत्या. तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातही काही आमदारांनी घोषणा देत शपथ घेतल्याने वाद निर्माण झाला होता. या एकूण पार्श्वभूमीवर व्यंकय्या नायडू यांची आजची प्रतिक्रिया आहे. 

शरद पवारांसह उदयनराजे भोसलेंनी घेतली खासदारकीची शपथ, राजीव सातव यांची मराठीतून शपथ

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटात खळबळ; भाजप आनंदीत