
लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची पहिली भेट दिल्लीत पार पडली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर परखड मत मांडली. इंडिया आघाडीच्या एकजुटीपासून ते मनसेशी युती आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेपर्यंत त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. या पत्रकार परिषदेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.