उदयनराजेंनी मध्यरात्री लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन दिला राजीनामा

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन उदयनराजेंनी राजीनामा सुपुर्द केला. उदयनराजे भोसले राजीनामा देण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि गिरीश महाजन हेही उपस्थित होते.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरी जाऊन राजीनामा दिला.

उदयनराजे यांनी आज (शनिवार) भाजप प्रवेशाची ट्विटरवरून अधिकृत घोषणा केली. विकासासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ते आज दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला. 

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन उदयनराजेंनी राजीनामा सुपुर्द केला. उदयनराजे भोसले राजीनामा देण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि गिरीश महाजन हेही उपस्थित होते. उदयनराजेंनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो तात्काळ मंजूर केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udyanraje Bhosale resigns MP Post in Delhi