शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपचे कार्य : उदयनराजे

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

छत्रपतींचे विचार घेऊन भाजप पुढे जात आहे. भाजपची प्रगती होत असून, अनेक जण त्यांच्याबरोबर जाण्यास उत्सुक आहेत. मोदींच्या नेतृत्वात मोठी प्रगती झाली आहे. काश्मीरचा मुद्दा मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण, मोदींनी हा प्रश्न सोडविला आहे. मी आज अनेक सहकाऱ्यांसह भाजपमध्ये जात आहे.

नवी दिल्ली : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी लोकशाही मजबूत करण्याचे काम केले आहे. तसेच भाजप हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे कार्य करत असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला.

उदयनराजे म्हणाले, की छत्रपतींचे विचार घेऊन भाजप पुढे जात आहे. भाजपची प्रगती होत असून, अनेक जण त्यांच्याबरोबर जाण्यास उत्सुक आहेत. मोदींच्या नेतृत्वात मोठी प्रगती झाली आहे. काश्मीरचा मुद्दा मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण, मोदींनी हा प्रश्न सोडविला आहे. मी आज अनेक सहकाऱ्यांसह भाजपमध्ये जात आहे. लोकांचे हित पाहून मी खासदारकीचा राजीनामा दिला. एवढ्या लवकर खासदारकीचा राजीनामा देणारा मी पहिला खासदार असेल. मोदींचे विचार मला खूप प्रभावित करतात. निस्वार्थ भावनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udyanraje Bhosale statement after enters BJP in delhi