Foreign Degree : परकी पदव्यांस मान्यता लवकर मिळणार; विद्यापीठ अनुदान आयोगाचे नवे नियम, विद्यार्थ्यांना दिलासा
Indian Students : परदेशातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण व नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने परकी पदव्या मान्य करण्याचे नवे नियम लागू केले आहेत.
नवी दिल्ली : परदेशातून शिक्षण घेऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात पुढील शिक्षण किंवा नोकरी करणे शक्य व्हावे म्हणून परकी विद्यापीठांच्या पदव्यांना मान्यता तसेच समकक्षता प्रदान करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नवे नियम लागू केले आहेत.