Sudha Murthy : 'माझ्या लेकीने तिच्या नवऱ्याला पंतप्रधान केलं'; ऋषी सुनक यांच्या सासूबाईंचं वक्तव्य

uk pm rishi sunak Mother-In-Law Sudha Murty says My Daughter Made Her Husband A Prime Minister
uk pm rishi sunak Mother-In-Law Sudha Murty says My Daughter Made Her Husband A Prime Minister

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांनी त्यांची मुलगी अक्षता मूर्ती यांनी त्यांच्या पतीला पंतप्रधान केले असल्याचा दावा केला आहे. ऋषी सुनक यांनी अल्पावधीतच सत्तेत झपाट्याने केलेली वाढ ही त्यांच्या मुलीमुळेच हे शक्य झाल्याचा दावा त्यांच्या सासूने केला आहे. सुधा मूर्ती यांचा या संबंधीचा व्हिडीओ समोर आला आहे.

सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. या व्हिडिओमध्ये दावा केला आहे की त्यांच्या मुलीमुळे ऋषी सुनक हे यूकेचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. व्हिडिओमध्ये सुधा मुर्ती या मी माझ्या पतीला उद्योगपती बनवले. तर माझ्या मुलीने तिच्या पतीला यूकेचे पंतप्रधान केले असे म्हणताना ऐकू येत आहे.

याचे कारण कारण हे पत्नीमुळे येणारं वैभव आहे. बायको नवरा कसा बदलू शकते पाहा. पण मी माझा नवरा बदलू शकले नाही. मी माझ्या पतीला उद्योगपती केले आणि माझ्या मुलीने पतीला पंतप्रधान केले, असे सुधा मूर्ती म्हणत आहेत. त्यांच्या हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.

ऋषी सुनक यांनी 2009 मध्ये अक्षता मूर्तींशी लग्न केले आणि त्यानंतर काही वर्षांमध्येच ते राजकारणात वरपर्यंत पोहचले. तसेच त्यांनी पंतप्रधान पद देखील मिळवलं.

uk pm rishi sunak Mother-In-Law Sudha Murty says My Daughter Made Her Husband A Prime Minister
Amruta Fadnavis : मला नरडं आहे, त्यांना गळा...; अमृता फडणवीसांच्या 'त्या' विधानावर सुषमा अंधारेंची खोचक टीका

दरम्यान अक्षता मूर्ती या जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक असलेले नारायण मुर्ती यांच्या कन्या आहेत. इतकेच नाही तर त्यांच्याकडे देखील अंदाजे 730 दशलक्ष पौंड इतक्या वैयक्तिक संपत्ती देखील आहे. जगभरातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश होतो.

अक्षता मूर्तींचे वडील नारायण मूर्ती हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत आणि इन्फोसिस टेक कंपनीचे संस्थापक आहेत. वयाच्या 42 व्या वर्षी, सुनक हे यूकेचे इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान तसेच केवळ 7 वर्षात पंतप्रधान झालेले खासदार आहेत.. अक्षतामूर्तींच्या आई सुधा मुर्ती या व्हिडिओमध्ये, त्यांच्या मुलीने पंतप्रधान सुनक यांच्या जीवनावर इतर मार्गांनी, विशेषत: त्यांच्या आहारावर कसा प्रभाव टाकला आहे याबद्दल देखील बोलताना दिसत आहेत.

uk pm rishi sunak Mother-In-Law Sudha Murty says My Daughter Made Her Husband A Prime Minister
Smartphone Blast : व्हिडीओ पाहताना झालेल्या फोनच्या स्फोटात ८ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; आता कंपनी म्हणते…

मूर्ती कुटुंबाने दर गुरुवारी उपवास करण्याची परंपरा फार पूर्वीपासून पाळली आहे. गुरुवारीच इन्फोसिस सुरू केली गेली, इतकेच नाही तर आमचे जावई त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून 150 वर्षे इंग्लंडमध्ये आहेत, पण ते खूप धार्मिक आहेत. लग्न झाल्यावर त्यांनी विचारलं तुम्ही काहीही गुरुवारी का सुरू करता, त्यांनी सांगितलं की आपण राघवेंद्र स्वामींकडे जाऊ. ते प्रत्येक उपवास करतात. गुड डे म्हटलं की गुरुवार. आमच्या सुनेची आई दर सोमवारी उपवास करते पण आमची सून गुरुवारी उपवास करते, असेही सुधा मुर्ती या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com