Uma Bharti : उमा भारती यांची चित्रफीत व्हायरल

काँग्रेसची टिप्पणी : मध्य प्रदेश बचावासाठी स्वागत असो
uma bharti madhya pradesh bjp big message to influential caste group politics
uma bharti madhya pradesh bjp big message to influential caste group politicssakal

भोपाळ : तुम्ही भाजपसाठी मतदान करावे असे मी म्हणेन, मात्र तुम्ही तुमचे हित लक्षात घेऊन कोणत्याही पक्षाला मत देण्यास मुक्त आहात, असे वक्तव्य भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तसेच मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी लोधी समाजाच्या कार्यक्रमात केल्याची चित्रफीत व्हायरल झाली आहे.

काँग्रेसच्या मध्य प्रदेश शाखेने सोशल मिडीयावर ही चित्रफीत पोस्ट केली असून मध्य प्रदेश बचावाच्या भव्य मोहिमेत तुमचे स्वागत असो, अशी उपरोधिक टिप्पणी उमा भारती यांना उद्देशून केली आहे.

लोधी समाजासाठी मोठा संदेश ः आता भाजपला मत देण्याची काहीही गरज नाही असे वरिष्ठ नेत्या उमा भारती यांचेच संकेत असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसच्या प्रसार माध्यम समितीचे प्रमुख के. के. मिश्रा यांनी सांगितले की, उमा भारती पक्षातील राजकीय पाठिंबा गमावत आहेत. तो पुन्हा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी आधी केलेली वक्तव्ये आणि घोषणांपासून घुमजाव केले असे मात्र आपण म्हणू शकत नाही.

लोधी समाजाचा वधू-वर मेळावा २५ डिसेंबर रोजी भोपाळमध्ये झाला. त्यावेळी उमा भारती यांनी हे भाषण केल्याचे चित्रफितीवरून दिसते. त्या लोधी समाजाच्या असून हा समाज इतर मागासवर्गीयांमध्ये येतो.

या चित्रफितीनुसार उमा भारती म्हणतात की, मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ती आहे. त्यामुळे माझ्या पक्षाच्या व्यासपीठावरून मी मते मागेन, पण माझ्या समाजाच्या लोकांनी त्यांचे स्वतःचे हित पाहून ठरवावे.

भाजपचे प्रत्यूत्तर

याविषयी भाजपचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांनी काँग्रेसला जोरदार प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष काहीही कारण नसताना रोमांचित झाला आहे. उमाजी या एक संत आहेत आणि त्या असे बोलत असतात. त्या निष्ठावान आहेत आणि प्रभू राम तसेच भाजपशी एकनिष्ठ आहेत. काँग्रेस अकारण आनंद प्रदर्शित करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com