
Umesh Pal Case: उमेश पाल हत्याकांड प्रकरणात पहिला गोळी झाडणाऱ्या उस्मानचा एन्काउंटर
उमेश पाल हत्याप्रकरणी प्रयागराज पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हत्याकांडप्रकरणात सहभागी असलेल्याचा विजय कुमार उर्फ उस्मान चौधरीचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. (Umesh Pal murder case update)
प्रयागराजच्या कौंधियारा भागात एन्काउंटर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान उस्मान चौधरीला गोळी लागली. जखमी अवस्थेत त्याला एसआरएन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला.
उमेश पाल खून प्रकरणातील हा दुसरा एन्काउंटर आहे. यापूर्वी पोलिसांनी अतिक अहमदचा जवळचा सहकारी अरबाजला मारले होते. उमेश पाल यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली क्रेटा कार अरबाज चालवत होता. अरबाजही अतिक अहमदची कार चालवत असे.
उमेश पाल यांची 24 फेब्रुवारीलाहत्या झाली होती
उमेश पाल यांची उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात २४ फेब्रुवारी रोजी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हा राजुपाल हत्याकांडातील साक्षीदार होता.
उमेश गाडीतून खाली उतरताच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यादरम्यान गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. नराधमांनी 44 सेकंदात हे हत्याकांड घडवून आणले.
अतिक अहमदवर उमेश पाल यांच्या हत्येचा आरोप आहे. अतिक सध्या साबरमती कारागृहात आहे. कारागृहात असताना अतिकनेच हत्येचा संपूर्ण कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. वास्तविक, अतिक अहमद हा राजुपाल हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे.
उमेश पाल हा राजुपाल हत्याकांडातील साक्षीदार होता. एवढेच नाही तर या हत्येमागील नवा ट्विस्ट समोर आला आहे. उमेश पाल यांचा अतिक अहमदसोबत जमिनीवरून वाद सुरू होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.