Union Budget 2023 : फक्त टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही तर निर्मला सितरामण यांच्या अर्थसंकल्पात आहे खूप काही खास

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर केले.
Union Budget 2023
Union Budget 2023

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर केले. यादरम्यान, त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी शेतकरी आणि आयकरच्या रचनेत बदलसंदर्भात सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच धान्य मोफत मिळणार असल्याचेही सांगण्यात आले.

जाणून घ्या अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा

शेतकऱ्यांसाठी काय आहेत घोषणा

शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करणार, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली. तसेच पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करणार, सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उपाय केले जाणार आहेत. यासोबतच कोविन, युपीआयचे जागतिक स्तरावर भारताचे स्थान मजबूत करण्यास लाभ होणार आहे.

आयकरदात्यांना मोठी सूट

मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नोकरदार वर्गांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 7 लाखापर्यंत उत्पन्न हे करमुक्त असणार आहे. 3 लाखांपर्यंत कर माफ असणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठी घोषणा

अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेचं बजेट ६६ टक्क्यांनी वाढवल्याची माहिती सीतारामन यांनी यावेळी दिली.

 प्रधानमंत्री आवास योजनेचे बजेट ६६% ने वाढवून ७९००० कोटी रुपये केले आहे. याशिवाय अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे.

रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींचे बजेट

मोदी सरकारने रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद केली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. आतापर्यंत सर्वांधिक मोठी आर्थिक मदत आहे. २०१३-१४ च्या तुलनेतील ९ पट मदत केली आहे. तसेच ५० नवी विमानतळं उभारणार असल्याचे घोषणा देखील  निर्माला सीतारामन यांनी केली आहे. 

MSME क्षेत्रासाठी चांगली बातमी

विविध क्षेत्रांसाठी यावेळी मोदी सरकारने विविध घोषणांची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी MSME क्षेत्राला चांगली बातमी दिली आहे.

महामारीमुळे प्रभावित झालेल्या एमएसएमईंना दिलासा दिला जाईल. करारातील वाद मिटवण्यासाठी ऐच्छिक समझोता योजना आणली जाणार असून, केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात एमएसएमई क्षेत्रासाठी 9000 कोटींची तरतूद केली आहे.

आरोग्यासाठी अर्थसंकल्पात नक्की काय?

मॅनहोल सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दिलासा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आता नालेसफाई मशीनद्वारे करण्यात येणार आहे. कोणताही कर्मचारी सफाईसाठी मॅनहोलमध्ये उतरणार नाही, अशी घोषणा सीतारामन यांनी केली आहे. तसंच २०४७ पर्यंत अ‍ॅनेमिया संपवण्याचं देशाचं उद्दिष्ट असल्याचंही सीतारामन यांनी म्हटलं आहे.

स्त्रीवर्गासाठी अर्थमंत्र्यांचं खास 'वाण'

तंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील महिलांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे. महिलांसाठी स्वांतत्र्यांच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधून पुढील दोन वर्षांसाठी महिला सन्मान बचतपत्र योजना आणली आहे. मार्च २०२५ पर्यंत ही योजना असणार आहे.

या योजनेअंतर्गत महिला किंवा मुलीच्या नावे २ लाख रुपये पॉझिट करता येणार आहे. दोन वर्षांच्या काळात या योजनेुळे महिलांना ७.५ टक्के व्याजदर मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी डिपॉझिट मर्यादा १५ लाखांहून ३० लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच महिन्याला उत्पन्न डिपॉझिट मर्यादा ४.५ लाखांहून ९ लाख करण्यात आली आहे. तर जॉइंट अकाऊंटसाठी ९ लाखांहून १५ लाखांची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात युवकांसाठी नवीन काय ?

युवकांमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी देशभर ३० स्कील इंडिया सेंटर्स उभारली जाणार आहेत. इंडस्ट्रीत प्रत्यक्ष काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या सेंटर्समध्ये दिले जाणार आहे.

देशातील विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

देशातील लहान मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलासांठीसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी स्थापन केले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. याशिवाय देशातील विविध भागात 157 नवीन नर्सिंग कॉलेजेसची स्थापन केली जाणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

तरुणांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी विविध राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्सची स्थापना केली जाणार आहे.

तसेच साडे तीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी एकलव्य शाळांची निर्मिती केली जाणार आहे

निर्मला सीतारामन यांची 'पॅन कार्ड'बाबत मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी एजन्सींमधील सर्व डिजिटल प्रणालीसाठी समान ओळख (Common Identifier) म्हणून पॅन कार्ड (Pan Card) वापरण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

या निर्णयामुळे KYC प्रक्रिया सुलभ होईल आणि आयकर विभाग आणि इतर सरकारी संस्थांना पॅन कार्डधारकांची कागदपत्रे मिळवणे सोपे होईल अशी अपेक्षा आहे.

काय होणार स्वस्त?

एलएडी टिव्ही स्वस्त होणार

कॅमेरा लेन्स स्वस्त होणार

मोबाईल फोन टिव्ही स्वस्त होणार

इलेक्ट्रोनिक गाड्या स्वस्त होणार

खेळणी, सायकल स्वस्त होणार

काय महागणार?

सिगारेट महागणार

विदेशी किचन चिमण्या महागणार

चांदीचे दागिने आणि भांडी महागणार

सोनं-चांदी, प्लॅटिनम महागणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com