CJI Chandrachud : सरन्यायाधीशांच्या या निर्णयाने मने जिंकली! कायदा मंत्र्यांनी केलं चंद्रचूड यांचं कौतुक

कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी चंद्रचूड यांच्या निर्णयाचे केले कौतुक
CJI Chandrachud
CJI ChandrachudEsakal

सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश जारी केल्याबद्दल केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांचे कौतुक केले आहे. उत्तराखंड दिवाणी न्यायाधीश भरतीसाठी प्राथमिक परीक्षा लिहिण्यासाठी 'राइटर्स क्रॅम्प' नावाच्या आजाराने त्रस्त असलेल्या न्यायिक सेवा परीक्षार्थीला न्यायालयाने एका व्यक्तीची मदत घेण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना कायदामंत्र्यांनी हृदयस्पर्शी असे या निर्णयाचे वर्णन केले आहे. त्यांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे कौतुक केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक सेवेतील उमेदवाराला परीक्षा लिहिण्यासाठी एखाद्या व्यक्तीची मदत घेण्याची परवानगी दिली आहे. याप्रकरणी न्यायालयाने अंतरिम आदेश जारी केला आहे. किरेन रिजिजू यांनी या आदेशाचे कौतुक करत म्हटले की, "मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी दिलेला हा निकाल हृदयस्पर्शी आहे. दिव्यांग उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे. AIIMSने उमेदवाराच्या अपंगत्वावर शिक्कामोर्तब केले होते.

CJI Chandrachud
Ajit Pawar: "थोडे दिवस थांबा अजित पवार कुठे असतील ते समजेल", शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण धनंजय कुमार यांचे आहे. परीक्षार्थी धनंजयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 20 एप्रिल रोजी उत्तराखंड लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्यासाठी कोणाची तरी मदत घेण्याची त्याची विनंती फेटाळली होती. धनंजयने 25 सप्टेंबर 2017 रोजी एम्सने जारी केलेले प्रमाणपत्रही सादर केले होते. धनंजयने दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायालयाने उत्तराखंड लोकसेवा आयोग आणि राज्य सरकारला नोटीस बजावत धनंजयची विनंती का फेटाळली, अशी विचारणा केली आहे.

CJI Chandrachud
Pune Crime: पुणे हादरलं! नशा करणाऱ्यांना हटकल्याने कोयत्याने वार करत एकाची हत्या

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने लोकसेवा आयोग आणि राज्य सरकारला 12 मे पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच धनंजयला परीक्षा लिहिण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला मदत करण्याचा अंतरिम आदेश लोकसेवा आयोगाला देण्यात आला आहे.

राइटर्स क्रॅम्प हा एक आजार आहे ज्यामध्ये लिहिताना हाताच्या स्नायूंना क्रॅम्प येतात. त्यामुळे लिहिणे कठीण होते. सोप्या भाषेत सांगायचे तर या आजारामुळे लिहिताना हाताला ताठरपणा येतो. धनंजय यांना एम्सकडून यासंदर्भात प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.

CJI Chandrachud
Pune: नवले पूलावर होत असलेल्या अपघातांच्या चौकशी समितीचा अहवाल तयार; अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com