Gas Price : आता पेट्रोल पॅटर्न गॅससाठीही; महिन्याला बदलणार दर

news about lpg gas
news about lpg gas

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी नैसर्गिक वायूच्या किमतीच्या नव्या फॉर्म्युल्याला मंजुरी दिली. सीएनजी आणि पाइपद्वारे स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी त्यावर मर्यादा किंवा कमाल किंमत लादली जाईल. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज बदल होत असतात. मात्र गॅसच्या किंमतीत महिन्यला बदल होणार आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, एपीएम गॅस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपारिक किंवा जुन्या क्षेत्रांमधून तयार होणारा नैसर्गिक वायू आता अमेरिका, कॅनडा आणि रशियासारख्या अधिशेष देशांमधील गॅसच्या किंमतींवर आधारित किंमतीऐवजी कच्च्या तेलाच्या किंमतीत अनुक्रमित केला जाईल.

news about lpg gas
Rupali Thombare: रुपाली ठोंबरेंचा भाजप नेत्याला संतप्त सवाल, बायकोमध्ये राखी सावंत...?

१ एप्रिलपासून एपीएम गॅसची किंमत भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलाच्या बास्केटच्या (इंडियन बास्केट ऑफ क्रूड ऑइल) किमतीच्या १० टक्के असेल. तथापि, हा दर ८.५७ डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट दराच्या तुलनेत ६.५ अमेरिकी डॉलर प्रति एमएमबीटीयू निर्धारित राहिल.

अशा किमतीची किमान मर्यादा ४ डॉलर प्रति एमएमबीटीयू असेल. ते म्हणाले की, दोन वर्षांच्या पुनरावलोकनाच्या सध्याच्या पद्धतीऐवजी दर महा दर निश्चित केले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com