
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली असून त्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण
कोरोनाचा संसर्ग वाढत असून गेल्या आठवड्याभरात अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भारती पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी दौरे केले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या. भारती पवार यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी ट्विटरवर म्हटलं की, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या घरीच क्वारंटाइन आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोरोना चाचणी करावी. तसंच कोरोनाच्या नियमांचे पालन करा आणि काळजी घ्या असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
Web Title: Union Minister Bharati Pawar Tested Covid 19 Positive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..