UP Crime News आजारी पतीला सोडून पत्नी जावयासोबत फरार, घरातील लाखोंचे दागिनेही केले लंपास

UP Crime News : उन्नाव जिल्ह्यातील अजगैन पोलीस हद्दीत एका महिलेने आजारी पतीला सोडून जावयासोबत घर सोडले आणि वडिलोपार्जित सोन्या-चांदीचे दागिनेही नेल्याचा आरोप आहे. मुलाने पोलीस अधीक्षक जय प्रकाश सिंह यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली.
Unnao Ajgain Woman Leaves Sick Husband With Son-in-Law

Unnao Ajgain Woman Leaves Sick Husband With Son-in-Law

esakal

Updated on: 

Unnao Woman Son-in-Law : उत्तर प्रदेशातील उन्नावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या आजारी पतीला सोडून चक्क जावयासोबत घरातून पळ काढल्याचा आरोप आहे. एवढेच नाही, तर घराच्या जमिनीत पुरून ठेवलेले वडिलोपार्जित सोन्या-चांदीचे लाखोंचे दागिनेही तिने सोबत नेल्याचा दावा पती आणि मुलाने केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पीडित पती आणि मुलाने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...