esakal | विनाअनुदानित गॅस सिलेंडर झाला स्वस्त; घरगुती ग्राहकांना दिलासा नाहीच!

बोलून बातमी शोधा

Gas-Cylinder
विनाअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त; घरगुती ग्राहकांना दिलासा नाहीच!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे. त्यानुसार, विनाअनुदानित १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत ४५.५० रुपयांनी कपात झाली आहे. मात्र, घरगुती गॅस ग्राहकांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत १० रुपयांनी कपात झाली होती. यानंतर महाराष्ट्रात सध्या १४ किलो गॅसच्या सिलिंडरची किंमत ८१४ रुपये आहे.

इंडेन ऑईलने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये १९ किलोच्या गॅस सिलेंडरची नवी किंमत १६४१ रुपयांऐवजी आता १५९५.५० रुपये आहे. मुंबईत १५९०.५० रुपये या जुन्या किंमतीऐवजी सिलिंडर आता १५४५ रुपयांना मिळेल. कोलकात्यात १७१३ रुपयांऐवजी १६६७.५० रुपये तर चेन्नईत १७७१.५० हून १७२६ रुपये इतकी गॅसची किंमत झाली आहे.

या वर्षी ११५ रुपयांनी वाढल्या घरगुती गॅसच्या किंमती

जानेवारीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. मात्र, त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी ६९४ रुपयांच्या गॅस सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढून ती ७१९ रुपये झाली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी ५० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर २५ फेब्रुवारीला २५ रुपयांनी पुन्हा किंमत वाढली. पुन्हा १ मार्च रोजी सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली आणि सिलेंडरची किंमत ८१९ रुपये झाली. त्यानंतर एप्रिल महिन्यात गॅसच्या किंमतीत केवळ १० रुपयांनी कपात झाली त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०९ रुपये झाली.