लस न घेणाऱ्यांनो...सरकारी योजनांपासून राहाल वंचित

Corona Vaccine
Corona Vaccineesakal

भारतातील अनेक राज्यात कोरोना (coronavirus) बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर अनेक राज्य सरकारांनी नव्याने निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राजस्थानचे (Rajasthan) आरोग्य मंत्री प्रसादी लाल मीना (Prasadi Lal Meena) यांनी आज ( दि.३०) एक नवी घोषणा केली. ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले नाहीत ते आता सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार आहे. तसेच ३१ जानेवारी २०२२ नंतर राज्यात लसीकरण न झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी जाता येणार नाही. (Rajasthan Corona Restriction)

Corona Vaccine
मुंबई-दिल्लीच्या काही भागात तिसऱ्या लाटेला सुरुवात - टास्क फोर्स सदस्य

प्रसादी लाल मीना यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'ज्या लोकांनी कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतलेले नाही. त्यांना आता कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ (Government Schemes) मिळणार नाही.' प्रसादी लाल मीना यांनी राज्यातील ओमिक्रॉनच्या परिस्थितीबद्दलही माहिती दिली. ते म्हणाले की, 'कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन हा फार घातक वाटत नाही. मात्र तो अत्यंत वेगाने पसरतो. आम्ही खबरदारी घेत आहोत. राजस्थानमध्ये परिस्थिती वाईट झालेली नाही. पण, जयपूरमधील स्थिती खराब आहे.'

Corona Vaccine
'तिसरी लाट भयानक असू शकते, ओमिक्रॉन तीनपट वेगाने वाढतोय'

प्रसादी लाल मीना (Prasadi Lal Meena) यांना राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही राज्यातील शहरात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'सध्या तरी केंद्र सरकारने प्रवासावर बंदी घातलेली नाही. आम्ही केंद्र सरकारने पर्यटकांच्या प्रवासाबाबतच्या नियमावलीचे पालन करत आहोत. आम्ही ३१ डिसेंबरसाठी काही नियमांमध्ये शिथीलता दिली आहे.'

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण (Children Vaccination) करण्यासाठी पुरेसा लसींचा साठा असल्याचेही प्रसादी लाल मीना यांनी सांगितले. राजस्थान सरकारने प्रसिद्ध केलेल्या आदेशात राजस्थानमधील नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच शाळा, कॉलेज, चित्रपट गृह, मॉलमध्ये जाता येणार आहे. ३१ जानेवारी २०२२ नंतर राज्यात लसीकरण न झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी जाता येणार नाही. (Rajasthan Corona Restriction)

Corona Vaccine
शिवसेनेच्या कार्यक्रमात कोरोना नियम पायदळी

राजस्थान सरकारने आपल्या आदेशात सांगितले आहे की राज्यात कोरोनाची लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचबरोबर सरकारने रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत जन अनुशासन कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याचेही सांगितले. राजस्थानमध्ये बुधवारी २३ नवे ओमिक्रॉनचे रुग्ण (Omicron Variant) आढळून आले आहेत. राज्यात आता ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ६९ वर पोहचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com