
इंफाळ - मागील कित्येक महिन्यांपासून मणिपूरमध्ये वारंवार हिंसाचाराच्या घटना घडत असल्यामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. सातत्याने लागू होणारी संचारबंदी, विविध समुदायांकडून पुकारण्यात येणारे सार्वजनिक बंद आणि हिंसाचारामुळे वारंवार बंद करण्यात येणारी इंटरनेट सेवा यामुळे मणिपूरमधील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे.