esakal | UP धर्मांतर प्रकरण: यवतमाळच्या तरुणाला कानपूरमध्ये अटक
sakal

बोलून बातमी शोधा

नायब तहसीलदारासह कारकुनाला लाच घेताना अटक

UP धर्मांतर प्रकरण: यवतमाळच्या तरुणाला कानपूरमध्ये अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उत्तर प्रदेश धर्मांतर प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरातून अनेकांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातही पसरल्याचं दिसत आहे. मुंबई आणि नाशिकनंतर यवतमाळ कनेक्शन समोर आलं आहे. यवतमाळमधील एका तरुणाला उत्तर प्रदेश एटीएस पथकाने (दहशतवादी विरोधी पथक) कानपूरमधून अटक केली आहे. या तरुणाचं नाव धीरज जगताप असल्याचं समोर आलं आहे. दहा वर्षांपूर्वी धीरजने धर्मांतर केल्याचं तपासात समोर आलं आहे. 20 जून रोजी उत्तर प्रदेशमध्ये अवैधरित्या धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर याचा तपास सुरु झाला. एटीएसने देशभरात विविध ठिकाणी कारवाई करत अटकसत्र सुरु केलं. उत्तर प्रदेश एटीएसने आतापर्यंत धर्मांतर प्रकरणात 14 पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे.

दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश एटीएसच्या पथकाने तिघांना अटक केली होती. यामध्ये नाशिकचा कुणाल अशोक चौधरी उर्फ आतिफ, मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) येथील मोहम्मद शरीफ कुरैशी व मोहम्मद इदरीस यांचा समावेश होता. आता आठवडाभरात आणखी एकाला अटक केली आहे. उत्तर प्रदेश धर्मांतर प्रकरणी याआधी बीडमधील एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश धर्मांतर प्रकरणाची पायामुळे महाराष्ट्रात खोलवर आहेत का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश एटीएसने मौलाना उमर गौतम, मौलाना कलीम सिद्दिकी सोबत महाराष्ट्र नेटवर्कच्या रामेश्वर कावडे उर्फ आदम उर्फ एडम भुप्रिया बंदो उर्फ अरसलान मुस्तफा आणि कौशर आलम या प्रमुख आरोपींना अटक करण्यात केली होती. यांची कसून चौकशी केली असता अनेक धागेदोरे समोर आले. त्यामध्ये धीरज जगताप याचेही नाव समोर आलं. त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने तात्काळ कारवाई करत धीरज जगताप याला कानपूरमधून ताब्यात घेतलं. अवैधरित्या धर्मांतरण करण्यासाठी धीरजकडून व्हॉट्सअप ग्रुप बनविण्यात आले होते. त्यामधून तो धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत होता अन् अवैध्यरित्या धर्मांतर करत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.

loading image
go to top