ISI Agent Arrested : फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकला सतेंद्र सिवाल; ISIच्या महिला एजंटने रिसर्चर असल्याचं सांगून...

ISI Agent Arrested by UP ATS : आयएसआय (ISI)च्या एका महिला गुप्तहेराने खोटं नाव आणि पत्ता सांगून भारतीय दूतावासातील कर्मचारी सतेंद्र याला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे
UP ats arrested pak isi agent indian embassy in moscow isi female spy honey trap posing as researcher marathi news
UP ats arrested pak isi agent indian embassy in moscow isi female spy honey trap posing as researcher marathi news

ISI Agent Arrested by UP ATS : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI)च्या एका महिला गुप्तहेराने खोटं नाव आणि पत्ता सांगून भारतीय दूतावासातील कर्मचारी सतेंद्र याला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. हा कर्मचारी हनी ट्रॅपमध्ये नेमकं कसा अडकला याबद्दल आता सविस्तर माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये सतेंद्र रशियातील भारतीय दूतावासात तैनात असताना त्याला आयएसआयने टार्गेट केलं. यानंतर आयएसआयची महिला गुप्तहेर खोटं नाव वापरून सतेंद्रशी आधी सोशल मीडियावर आणि नंतर फोनवर बोलू लागली. दोघांमध्ये अनेकदा व्हिडिओ कॉल देखील होत असत. याचाच फायदा घेत आयएसआयच्या महिला एजंटने सतेंद्र याच्याकडून सर्व गोपनीय माहिती मिळवली. सतेंद्र सिवाल हा वर्ष 2021 मध्ये रशियातील भारतीय दूतावासात आयबीएसए म्हणजेच इंडिया बेस्ड सिक्योरिटी असिस्टंट म्हणून कार्यरत होता. तेव्हापासून सतेंद्र रशियाच्या मॉस्कोमध्ये ड्युटीवर होता आणि अधूनमधून हापुडला येत असे.

फेसबुकवर झाली मैत्री

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी आयएसआयच्या महिला एजंटने सतेंद्रला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आयएसआयच्या महिला गुप्तहेराने आपले नाव पूजा असल्याचे सांगितले आणि ती एक संशोधक असल्याचेही सांगितले. काही महिने या दोघांमधील बोलणे फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून सुरू होते. यानंतर आयएसआयच्या महिला गुप्तहेराने सतेंद्र याच्याकडे संशोधनाच्या बहाण्याने भारतीय लष्कर, भारतीय संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयासह अनेक प्रकारची माहिती मागितली. सतेंद्रला या कामासाठी पैसे ही देण्याबद्दल सांगण्यात आलं.

तेव्हापासून सतेंद्र आयएसआयच्या महिला एजंटसोबत सर्व माहिती शेअर करत होता. यातील अनेक कागदपत्रांचे फोटो आरोपीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यामध्ये घेतलो असून मोबाइलच्या तपासणीनंतर ही बाब उघड झाली आहे. सध्या भारतीय गुप्तचर यंत्रणा कथित आयएसआय महिला एजंटच्या सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी करत आहेत. त्या आयडीच्या संपर्कात अन्य लष्करी किंवा दूतावासातील कर्मचारी आहेत का, याचा देखील शोध घेतला जात आहे.

UP ats arrested pak isi agent indian embassy in moscow isi female spy honey trap posing as researcher marathi news
ISI Agent Arrest: मॉस्कोतील भारतीय दूतावासात पाकिस्तानी एजंट? यूपी एटीएसकडून अधिकाऱ्याला अटक, ISI ला माहिती दिल्याचा आरोप

हनीट्रॅपमध्ये कसं अडकवलं जातं?

महिला आयएसआय गुप्तहेर सोशल मीडियावर बनावट नावे वापरून प्रोफाइल तयार करतात. यानंतर दुसऱ्या देशाच्या लष्कराशी संबंधित सैनिक, लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि दूतावासात काम करणाऱ्या लोकांना लक्ष्य केले जाते. या लोकांशी आधी सोशल मीडियावर संपर्क वाढवला जातो आणि त्यानंतर मोबाइल नंबरही शेअर केला जातो. अशा प्रकारे त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आयएसआयच्या महिला एजंट आपल्या कामाची माहिती मिळवतात. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

भारतीय दूतावासातील कर्मचारी सतेंद्र याला हनीट्रॅप मध्ये ओढून आयएसआयने परदेशी प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची माहितीही मिळवली होती. यामुळे या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. तसेच या अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

एटीएसच्या चौकशीदरम्यान सुरुवातीला सतेंद्रन या सर्व गोष्टी नाकारल्या. मात्र, नंतर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आरोपीचा मोबाइल रिकव्हर करण्यात आला आणि तपासादरम्यान अनेक लष्करी कागदपत्रे सापडली तेव्हा सतेंद्रने संपूर्ण हकीकत सांगीतली.

UP ats arrested pak isi agent indian embassy in moscow isi female spy honey trap posing as researcher marathi news
नोकरीसाठी जात चोरली, निवृत्तीला 2 दोन वर्ष शिल्लक असताना समोर आलं सत्य; कोर्टात किती झाली शिक्षा?

सोशल मीडियावरून कोणती माहिती पाठवली?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्रने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याला आयएसआयच्या एका महिला गुप्तहेराने फसवलं आणि सोशल मीडियावर तयार केलेल्या अकाऊंटद्वारे परराष्ट्र मंत्रालयाची कागदपत्रे महिलेला पाठवण्यात आली. यातील सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे परदेशात प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या किंवा ज्यांना परदेशात पाठवले जात होते, अशा लष्करी अधिकाऱ्यांची माहिती होती.

या अधिकाऱ्यांची तसेच युनिटची नावे व पदाचे नाव ही सर्व माहिती सतेंद्रने लीक केली होती. लष्करी करार आणि शस्त्रास्त्रांबाबत दोन्ही देशांमधील पत्रव्यवहाराची माहितीही लीक झाली. याशिवाय आरोपी सतेंद्रने भारत आणि रशिया यांच्यातील परराष्ट्र मंत्रालय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या करारांच्या प्रती आयएसआयला देण्यात आल्या. दरम्यान आता चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आयएसआयकडे किती माहिती पोहोचली याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com