

UP
esakal
उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. वाराणसीत झालेल्या भाजपच्या ‘समरसता संकल्प अभियाना’दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भदोहीचे नाव बदलून ‘संत रविदास नगर’ करण्याचा प्रस्ताव मांडला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समरसतेचा संदेश देण्यासाठी आणि दलित समाजाशी जोडले जाण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा आहे. मात्र, नाव बदलण्याच्या या प्रस्तावामुळे भदोहीच्या राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.