esakal | Video : भाजप कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारल्याचा पोलिसाचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Video : भाजप कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारल्याचा पोलिसाचा आरोप

Video : भाजप कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारल्याचा पोलिसाचा आरोप

sakal_logo
By
नामदेव कुंभार

लखनौ - विभाग पंचायत प्रमुखांच्या निवडणुकीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारल्याचा दावा कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केला आहे. तसे तो वरिष्ठांना दूरध्वनीवरून सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाली आहे. चित्रफितीनुसार इटावाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांतकुमार प्रसाद यांच्या बाबतीत जिल्ह्यातील बढपुरा विभागात हा प्रकार घडल्याचे कळते. यास जिल्हा पोलिस प्रवक्त्याने दुजोरा दिला. याप्रकरणी एका ज्ञात काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारी अशा ४७६ पदांसाठी निवडणुका झाल्या. त्यावेळी १७ जिल्ह्यांतून निवडणूक हिंसाचाराच्या काही बातम्या आल्या. प्रतिस्पर्धी कार्यकर्त्यांच्यात तसेच पोलिस आणि कार्यकर्त्यांच्यात मारामारी झाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण्यात आले. दगडफेक आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. काही ठिकाणी पोलिस कर्मचारी जखमी झाले.

भाजपची सरशी

विभाग पंचायत प्रमुखांच्या ८२५ पैकी ६३५ जागांवर विजय मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्यादृष्टिने हे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.

loading image