
Police Smriti Din
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. सीएम योगी यांनी रिझर्व्ह पोलीस लाइन्स स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले.
१ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ या एका वर्षाच्या काळात उत्तर प्रदेशसह देशभरातील सर्व राज्ये आणि निमलष्करी दलाचे एकूण १८६ जवान कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. या शहीदांमध्ये उत्तर प्रदेशातील तीन शूर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.