Asad Ahmed Encounter : अतिक अहमदच्या मुलाचे एन्काउंटर, CM योगींची पहिली प्रतिक्रिया

UP cm yogi first reaction on Former MP-Atiq Ahmed son Asad and his aide killed in an encounter by UP Police rak94
UP cm yogi first reaction on Former MP-Atiq Ahmed son Asad and his aide killed in an encounter by UP Police rak94
Updated on

उमेश पाल हत्याकांडातील (Umesh Pal murder case) फरार गँगस्टर अतिक अतीकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने एन्काऊंटर मध्ये ठार केले. दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झाशी येथे त्यांची चकमक झाली. यादरम्यान त्यांच्याकडून विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आल्याचा एसटीएफने दावा केला आहे.

या चकमकीबाबत, यूपी पोलिसांनी माहिती दिली की, असदचा मुलगा अतिक अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते. या दोघांवर आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशीमध्ये डीएसपी नवेंदू आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपी एसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत हे दोघे मारले गेले. या दोघांकडून अनेक विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

UP cm yogi first reaction on Former MP-Atiq Ahmed son Asad and his aide killed in an encounter by UP Police rak94
Asad Ahmed Encounter: गँगस्टर आतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर!

सीएम योगी आदित्यनाथ यांनी यावर प्रतिक्रिया देताना यूपी एसटीएफचे कौतुक केले आहे. त्याचवेळी गृह मुख्य सचिव संजय प्रसाद यांनी या इन्काउंटरची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. या चकमकीनंतर कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला.

यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एसटीएफ टीमचे कौतुक केले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट केलं आह. यूपी एसटीएफचं अभिनंदन करतो. उमेश पाल अॅडव्होकेट आणि पोलिस जवानांची हत्या करणाऱ्यांना अशीच शिक्षा मिळायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.

UP cm yogi first reaction on Former MP-Atiq Ahmed son Asad and his aide killed in an encounter by UP Police rak94
Eknath Shinde News : मातोश्रीवर मुख्यमंत्री शिंदे रडले? संतोष बांगर यांनी सांगितलं नेमकं काय घडलं

तसेच उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की, उत्तर प्रदेशातून गुंड माफिया आणि गुन्हेगारांचा नायनाट करू, हा आमचा संकल्प आहे. घटना नुकतीच घडली आहे, पूर्ण माहिती येताच जाहीर केली. असे गुनेहा करणारा कोणीही गुन्हेगार राज्यात मोकळा फिरणार नाही. उत्तर प्रदेश कायद्याद्वारे शिक्षा होण्यात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात कोणताही गुन्हेगार गुन्हा करून पळून जाऊ शकणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.