UP Construction Workers: बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला ५.२५ लाखांपर्यंत मदत; यूपी सरकारची योजना नेमकी काय?

UP Construction Workers, Death Assistance Scheme, ₹5.25 Lakh Aid : उत्तर प्रदेशातील नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पात्र वारसांना अंत्यसंस्काराच्या मदतीसह एकूण ५.२५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
UP Construction Workers

construction worker scheme uttar pradesh

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेश: बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटाच्या काळात आधार मिळावा, यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या कामगार विभागांतर्गत ‘उत्तर प्रदेश इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळा’कडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकी ‘बांधकाम कामगार मृत्यू व दिव्यांग सहाय्यता योजना’ ही महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे.

या योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या पात्र वारसांना अंत्यसंस्काराच्या मदतीसह एकूण ५.२५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. सामान्य मृत्यूच्या प्रकरणात २.२५ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. कामाच्या ठिकाणी अपघात होऊन अनोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबासाठीही १ लाख रुपयांच्या एकरकमी मदतीची तरतूद आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com