सिद्धार्थनगर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर (Siddharthnagar) जिल्ह्यात इंदूरमधील सोनम-राजा रघुवंशी प्रकरणासारखाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे संगीता नावाच्या विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची विष घालून निर्घृण हत्या केलीये. नंतर मृतदेह राप्ती नदीत (Rapti River) फेकून, पती बेपत्ता असल्याची बनावट तक्रार तिनं पोलिसांत नोंदवलीये.