esakal | 'कायद्याने कायद्याचे राज्य', मुख्तार अन्सारींचा पत्ता कापून मायावतींनी केली मोठी घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

बाहुबलींना स्थान नाही; मुख्तार अन्सारींना दणका देत मायावतींचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी बसपा अध्यक्षा मायावती यांनी मोठी घोषणा केली आहे.

बाहुबलींना स्थान नाही; मुख्तार अन्सारींना दणका देत मायावतींचा मोठा निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनऊ - उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी बसपा अध्यक्षा मायावती यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या निवडणुकीसाठी कोणत्याही बाहुबली किंवा माफियाला तिकिट देणार नाही असं मायावतींनी ट्विटरवरून सांगितलं आहे. कायद्याने कायद्याचे राज्य असं म्हणत त्यांनी उत्तर प्रदेशची प्रतिमा बदलणार असा संकल्प केल्याचे मायावतींनी सांगितले आहे.

मायावती यांनी ट्विटरवरून म्हटलं की, आगामी निवडणुकीत पक्षाकडून बाहुबली किंवा माफियांना तिकिट दिलं जाणार नाही. याची सुरुवात करताना आजमगढमधील मऊ विधानसभा मतदारसंघातून मुख्तार अन्सारी यांच्याऐवजी बसपा प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांना संधी देणार असल्याचंही मायावतींनी स्पष्ट केलं.

मायावती यांनी म्हटलं की, जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर या निर्णयाची अंमलबजावणी करायला हवी. पक्षाच्या प्रभारींना विनंती आहे की, त्यांनी उमेदवारांची निवड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सरकार स्थापन झाल्यानंतर अशा लोकांविरुद्ध कारवाई करताना अडचण येणार नाही.

बसपा कोणत्या मुद्यावर निवडणूक लढेल याचेही संकेत मायावतींनी दिले आहेत. उत्तर प्रदेशची प्रतिमा बदलण्याचा पक्षाचा प्रयत्न असून कायद्याने कायद्याचे राज्य असा संकल्प बसपाने केला आहे. यामुळे फक्त राज्यच नाही तर देशातील प्रत्येकाला वाटलं पाहिजे की सरकार असावं तर मायावतींच्या 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' असं. बसपा जो संकल्प करते तो पूर्ण करते हीसुद्धा पक्षाची ओळख असल्याचं मायावती म्हणाल्या आहेत.

loading image
go to top