

The Uttar Pradesh Agriculture Department has started online booking for agriculture machinery subsidy under various government schemes till August 10, 2026.
Sakal
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने शेती करावी, यासाठी राज्याच्या कृषी विभागाने विविध योजनांअंतर्गत कृषी यंत्रांवर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विभागाच्या माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, कृषी विभागाच्या संकेतस्थळावर विकासखंडनिहाय अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शेतकरी 'किसान कॉर्नर' या विभागातून अर्ज करू शकतात.