CM Yogi Adityanath
sakal
देश
CM Yogi Adityanath: शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे! योगी सरकारकडून ४६० कोटींचा 'बंपर' डोस; २.५१ लाख लाभार्थींना मिळाला थेट फायदा
UP Farmer Aid: उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी ४६० कोटींचा बंपर डोस जाहीर केला. २.५१ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करून दिलासा मिळवला. नैसर्गिक संकट, अपघात आणि पिक विमा योजनेअंतर्गत मदत पोहोचवून शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला गती मिळाली.
शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी मदतीचा मोठा हात पुढे केला आहे. सव्वा दोन लाखांहून अधिक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात सरकारने कोट्यवधी रुपये जमा केले असून, यामुळे अडचणीत असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

