धर्मांतर प्रकरण; गँगस्टर अ‍ॅक्ट, NSA अंतर्गत कारवाईचे योगींचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

up conversion

प्रलोभने दाखवून जबरदस्तीने धर्मांतर करणे भाग पाडणाऱ्या टोळीच्या कारवाया उत्तर प्रदेशमधील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उघडकीस आणल्या होत्या. यातील उमर गौतम आणि जहाँगीर आलम यांना अटक करण्यात आली.

धर्मांतर प्रकरण; गँगस्टर अ‍ॅक्ट, NSA अंतर्गत कारवाईचे आदेश

लखनऊ- प्रलोभने दाखवून जबरदस्तीने धर्मांतर करणे भाग पाडणाऱ्या टोळीच्या कारवाया उत्तर प्रदेशमधील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उघडकीस आणल्या होत्या. यातील उमर गौतम आणि जहाँगीर आलम यांना अटक करण्यात आली. या दोघांविरोधात गँगस्टर कायदा (Gangster Act ) आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत (National Security Act) कारवाई करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. उमर गौतम आणि जहाँगीर आलम यांच्या टोळीने आतापर्यंत एक हजार लोकांचे धर्मांतर केले असल्याचा आरोप आहे. (UP govt orders action under Gangster Act NSA against 2 arrested for conversion of disabled kids)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच संबंध एजेन्सीला याप्रकरणी अधिक तपास करत यामागील संपूर्ण रॅकेटचा पर्दापाश करण्यास आणि यातील दोषींच्या मुसक्या आवळण्यास सांगितलं आहे. योगी सरकारने आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या टोळीने मूकबधिर मुले व महिलांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे धर्म परिवर्तन केल्याचे सांगितले जाते.

अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, ‘‘उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत आहे. मुस्लिमेतर लोकांना मुस्लीम बनविण्याच्या कारवायांची माहिती मिळाल्याने आम्ही ‘एटीएस’ला सावधान केले. नियोजित कटाद्वारे धर्मांतराचे काम राज्यात सुरू असून त्याचा तपास सुरू आहे. धर्मांतरप्रकरणी विपुल विजयवर्गीय आणि कासिफ यांना अटक केली होती. लोकांना प्रलोभन दाखवून धर्मांतर करणारी एक टोळी कार्यरत असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. या उमर गौतम याचे नाव समजले, असे ते म्हणाले.

प्रशांत कुमार म्हणाले की, उमर आणि त्याचा साथीदार मुफ्ती काझी जहाँगीर यांना रविवारी (ता. २०) अटक केली तेव्हा सुमारे एक हजार लोकांना प्रलोभन दाखवून आणि पैसे देऊन त्यांचे धर्मांतर केले असल्याचे उघडकीस आले. लखनौ येथे ‘एटीएस’ने एक गुन्हा दाखल केला आहे. त्याआधारे या दोघांना अटक केली असून एक संस्था आणि अन्य काही जणांची नावेही आले आहेत. धर्मांतरासाठी मूकबधिर, मुले व महिलांना लक्ष्य केले जात असे. महिलांचे धर्मांतर करून दुसऱ्या धर्मातील लोकांबरोबर लग्न लावले आहे. नोएडा, कानपूर, मथुरा व वाराणसी आदी जिल्ह्यांमध्ये ही टोळी कार्यरत आहे. उमर आणि त्याचे साथीदार जामियानगर येथे एक संस्था चालवितात ज्याचा मुख्य उद्देश धर्मांतर करणे आहे. यासाठी बँक खाती आणि अन्य माध्यमांमधून पैसे पुरविले जातात. त्यांना विदेशातून विशेषतः पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’कडूनही (आयएसआय) आर्थिक मदत मिळत होती.

धर्मांतर करून दुसऱ्या राज्यात रवानगी

नोएडा डेफ सोसायटीमध्ये मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा चालविली जाते. तेथील विद्यार्थी-विद्यार्थ्यांना नोकरी, विवाह अशा प्रलोभने दाखवून धर्मांतर केले जाते. शाळेतील एका विद्यार्थ्याच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की, त्यांनी त्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्याचे धर्मांतर करून त्याला दक्षिणेतील एका राज्यात नेल्याचे मुलानेच व्हिडिओ कॉलद्वारे कळविले. ही टोळी अन्य राज्यांमध्येही सक्रिय असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.