

UP Jobs
esakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखनौमध्ये एका भव्य कार्यक्रमात तरुणांना रोजगाराचे मोठे आश्वासन दिले आहे. ६०९ नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करताना त्यांनी जाहीर केले की, आगामी एक वर्षात राज्यात आणखी दीड लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.
लखनौमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केवळ नोकऱ्यांची घोषणाच केली नाही, तर मागील सरकारांमधील भरती प्रक्रियेतील त्रुटींवरही जोरदार टीका केली.