Uttar Pradesh News: UP मध्ये पुन्हा नामांतर! योगींचा डबल धमाका! योगी सरकारकडून ३३१ कुटुंबांना जमीन मालकी हक्क

331 Families Receive Land Ownership Rights: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा निर्णय घेत गावाचे नाव बदलून ‘रवींद्र नगर’ असे ठेवले.
Uttar Pradesh News

Uttar Pradesh News

esakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी दौऱ्यावर असताना एका ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली आहे. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मोहम्मदी तहसीलमध्ये असलेल्या 'मियांपूर' या गावाचे नाव बदलून आता 'रवींद्र नगर' करण्यात आले आहे. फाळणीच्या वेळी विस्थापित झालेल्या हिंदू बांधवांना सन्मान मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लखीमपूर खेरी येथे २१३ विकासकामांचे लोकार्पण करताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी विस्थापित हिंदू कुटुंबांना त्यांचे अधिकार बहाल केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com