esakal | मास्क न घातल्यामुळे हातापायात ठोकले खिळे, पोलिसाचा निर्दयीपणा
sakal

बोलून बातमी शोधा

मास्क न घातल्यामुळे हातापायात ठोकले खिळे, पोलिसाचा निर्दयीपणा

मास्क न घातल्यामुळे हातापायात ठोकले खिळे, पोलिसाचा निर्दयीपणा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

देशात कोरोना महामारीचं संकट अतिशय भयावह परिस्थिती आहे. रुग्णसंख्या आटोक्यात येत असेल तरीही भविष्यात याचा धोका कायम आहे. त्यामुळेच मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि लसीकरण अशा त्रिसुत्रीचा फॉर्मुल्यावर देशभरात लढा दिला जातोय. मात्र, काहीजण या नियमांचं उल्लंघण करत असल्याचेही समोर येतं. यासाठी सरकारनं आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. मात्र, काही पोलिसांचा अथवा सरकारी आधिकाऱ्याचा निर्दयीपणा सोशल मीडियावर व्हायरल होतो. असाच उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) एक प्रकार समोर आला आहे. मास्क न घातल्यामुळे उत्तर प्रदेशमधील पोलिसानं 28 वर्षीय तरुणाच्या हातात आणि पायात खिळे ठोकले. उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. (UP man alleges cops hammered nails into hand, leg for not wearing mask)

24 मे 2021 रोजी बरेलीमधील जोगी नावदा परिसरात हा प्रकार घडला आहे. तरुणाची आई कुसुम लता यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना पोलिसांवर आरोप लावले. त्या म्हणाल्या की, माझा मुलगा रंजित रात्री दहा वाजता घराबाहेर बसला होता. त्यावेळी पोलिस तेथे पोहचले होते. पोलिसांनी सर्वांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पोलिस आणि रंजीत यांच्यामध्ये शाब्दिक वाद जाला. वादानंतर लॉकडाउनचं उल्लंघन केल्याचा आरोप करत पोलिस त्याला जबरदस्ती घेऊन गेले. त्याच्या हातात आणि पायात खिळे ठोकले अन् घरासमोर आणि फेकलं.

हेही वाचा: चिमुकल्याला दिले गरम चमच्याचे चटके! जेवताना लघुशंका केल्याने निर्दयी बापाचे कृत्य

बरेलीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक रोहित सिंह साजवान (Senior Superintendent of Police (SSP) ) यांनी सर्व आरोपाचं खंडन केलं आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी तरुणानेच हे कांड केल्याचं सांगितलं. एसएसपी साजवान म्हणाले की, रंजीत 24 मे रोजी मास्क न घालता फिरत होता. पोलिसांनी याबाबत त्याला विचारणा केली. मात्र त्यानं वाद घातला. त्याच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यापासून वाचण्यासाठी रजींतनं स्वत: हातात आणि पायात खिले ठोकून घेतले आहेत.