शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का
UP man gets Rs 9900 crore credited into his bank account
UP man gets Rs 9900 crore credited into his bank account esakal

पोलीस स्टेशन हद्दीतील अर्जुनपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये ९९ अब्ज रुपयांहून अधिक रक्कम आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही माहिती मिळताच खातेदारासह बँक व्यवस्थापकांना मोठा धक्का बसला. भानू प्रकाश यांच्या केसीसी खात्यातील थकबाकीमुळे हा प्रकार घडल्याचे व्यवस्थापकाचे म्हणणे आहे. सध्या खाते होल्डवर ठेवण्यात आले आहे.

दुर्गागंजच्या अर्जुनपूर गावात राहणारे भानुप्रकाश बिंद यांचे सुरियावानच्या बँक ऑफ बडोदा ग्रामीण बँकेत खाते आहे. गुरुवारी, १६ मे रोजी अचानक त्याच्या खात्यात ९९९९९४९५९९९.९९ (९९ अब्ज ९९ कोटी ९४ लाख ९५ हजार ९९९ रुपये) रक्कम आली. इतकी मोठी रक्कम अचानक खात्यात आल्याचे समजल्यानंतर बँक कर्मचारी देखील चक्रावले. त्यांनी तत्काळ याची माहिती भानुप्रकाश यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी बँक गाठली. पैसे कोठून आले हे माहित नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर खाते होल्डवर ठेवण्यात आले आहे.

UP man gets Rs 9900 crore credited into his bank account
J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

प्रभारी बँक व्यवस्थापक आशिष तिवारी यांनी सांगितले की, खातेधारक भानू प्रताप यांचे केसीसी खाते आहे. त्यांनी शेतीवर कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न केल्यास खाते एनपीए होते. त्यामुळे त्याच्या खात्यात जास्त पैसे येऊ लागले. खाते होल्डवर ठेवले आहे. दुसरीकडे या प्रकरणाची माहिती मिळताच लोकांमध्ये याबाबत चर्चा होताना दिसली.

UP man gets Rs 9900 crore credited into his bank account
Arvind Kejriwal : केजरीवाल पुन्हा रस्त्यावर;‘आप’चा मोर्चा आज भाजप मुख्यालयावर धडकणार

पैसे कोठून आले याची चौकशी सुरू

बँकेचे प्रभारी व्यवस्थापक आशिष तिवारी यांनी सांगितले की, पैसे कोठून आले आणि कोणी पाठवले याचा तपास केला जात आहे.

बँकेने खाते फ्रीज केले

एवढी रक्कम अचानक खात्यात आल्यानंतर बँक कर्मचारी चक्रावले आहेत. तत्काळ संबंधित खात्यातून व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या तपास सुरू आहे.

UP man gets Rs 9900 crore credited into his bank account
Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com