Uttar Pradesh : NEP-2020 चे पाचही कौशल्य निकष पूर्ण करणारे उत्तर प्रदेश देशातील पहिले राज्य; २ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

UP NEP 2020 Skill Development Project : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे व्यावसायिक शिक्षणातील पाचही कौशल्य निकष पूर्ण करणारे उत्तर प्रदेश पहिले राज्य ठरले आहे. ‘प्रोजेक्ट प्रवीण’अंतर्गत २०२६-२७ मध्ये ५१५ शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना तांत्रिक, डिजिटल, आर्थिक व्यवस्थापन आणि उद्योजकता प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Uttar Pradesh expands Project Praveen to train two lakh school students in technical, digital and entrepreneurial skills.

Uttar Pradesh expands Project Praveen to train two lakh school students in technical, digital and entrepreneurial skills.

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेश : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत व्यावसायिक शिक्षणाचे पाचही कौशल्य निकष पूर्ण करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्य सरकारने ‘प्रोजेक्ट प्रवीण’ या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्यातील ५१५ शाळांमधील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्यांसोबत संवादकौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल कौशल्य, आर्थिक व्यवस्थापन आणि उद्योजकतेचे धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ नोकरी मिळवण्यासाठी नव्हे, तर भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीही तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Loading content, please wait...